Breaking News

अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या मायलेकींना अटक

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 7, 2021 1:14 pm
|

ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ओढून त्यांचा वापर करणाऱ्या मायलेकींना अटक केली आहे. सोमवारी सायंकाळी ही कारवाई ठाण्यातील जुने पासपोर्ट कार्यालय जवळील एका हॉटेलमध्ये करण्यात आली . या दोघीच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलींची सुटका करून त्यांची रवानगी महिला बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

एक महिला आणि तिची मुलगी अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात लोटत आहे, अशी माहिती समाज सेवक डॉ.बिनू वर्गीस यांना मिळाली. डॉ. वर्गीस यांनी ही माहिती ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाचे प्रमुख अशोक कडलग यांना दिली. तसेच ठाण्यातील जुने पासपोर्ट कार्यालया जवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये दोन अल्पवयीन मुलींची विक्री करण्यात येणार आहे अशीही माहिती वर्गीस यांनी दिली.या माहितीच्या आधारे मानवी तस्करी विरोधी पथकाचे प्रमुख कडलग यांनी त्या ठिकाणी एक बोगस ग्राहक म्हणून खात्री करण्यासाठी पाठवले. असता त्या ठिकाणी १६ आणि १७ वयोगटातील मुलींचा एक लाख रुपयांना सौदा होत असताना मानवी तस्करी विरोधी पथकाने आणि डॉ.वर्गीस यांच्या समक्ष हॉटेलवर छापा टाकून विक्री करण्यासाठी आणण्यात आलेल्या मुलीची सुटका करून एक महिला आणि तिच्या मुलीला ताब्यात घेवून अटक करण्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिली


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 7, 2021, 1:14 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *