MPSC Exam Date : MPSC ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल नाही
मुंबई : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला . त्यानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करुन आपला राग व्यक्त करत MPSC परीक्षेच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण तापले होते. यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात होती. पण आता संदर्भात महत्वाचा निर्णय समोर आला आहे. .संयुक्त पूर्व परीक्षा गट ब परीक्षा रविवारी ११ एप्रिल रोजी MPSC ची परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान , राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोलन करणारे विद्यार्थी आता ११ एप्रिलची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहीजण दुखणे अंगावर काढत आहेत. परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 6, 2021, 8:44 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY