Katrina Kaif Corona Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा , अभिनेत्री कतरिना कैफ पॉझिटिव्ह
मुंबई :कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आता बॉलिवूडला जणू काही कोरोनाचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. अभिनेते गोविंदा, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटी आतापर्यंत संक्रमित झाले आहे. यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्री कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टेट्सच्या माध्यमातून ही माहिती दिली.
अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘माझा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. मी त्वरित स्वत:ला आयसोलेट केले आहे व सध्या मी घरीच आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. मी माझ्या संपर्कातील सर्व लोकांना आवाहन करते की त्यांनी त्वरित स्वतःची चाचणी करून घ्या. आपले प्रेम आणि पाठींब्याबद्दल धन्यवाद. सुरक्षित राहा आणि स्वत: ची काळजी घ्या.
अलीकडच्या काळात अक्षय कुमार, आमिर खान, आलिया भट्ट, आर माधवन, रणबीर कपूर, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गायक आदित्य नारायण पत्नी श्वेता अगरवाल, अभिनेत्री भूमी पेडणकर, विक्की कौशल, कॉमेडीयन कुणाल कामरा, शशांक खेतान, मनोज बाजपेयी, यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांना कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षी गायली कनिका कपूर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान , सोमवारी देशात कोविड 19 च्या नवीन 1,03,558 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण 478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आज कोविड 19 च्या नवीन 96,982 रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर, संक्रमित लोकांची एकूण संख्या 1,26,86,049 वर गेली. कोरोनामुळे आतापर्यंत 1,65,547 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 6, 2021, 7:43 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY