परमबीर यांच्या आरोप प्रकरणी सुप्रीम कोर्टात राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या दोन स्वतंत्र याचिका
नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वतीने तर दुसरी राज्य सरकारच्या वतीनं अशा दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सीबीआयच्या येण्यामुळे राज्यांच्या अधिकारांवर केंद्राचे अतिक्रमण या मुद्द्यावर राज्य सरकारची याचिका आहे. तर, दुसरीकडे अनिल देशमुख हेदेखील न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीसाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे, त्यामुळे ही सुनावणी तातडीने गरजेची असून, लवकर यावर सुनावणी व्हावी, असे या याचिकेत म्हटले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 6, 2021, 7:18 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY