‘सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?’
आत्महत्या केली सुशांतने आणि जेलमध्ये गेला बिचारा अर्णव : राज ठाकरे
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबद्दल माहिती दिली.त्यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. . “शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केलं पाहिजे. खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. विशेष गर्दी न होता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. ह्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा, तसेच “अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील करोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, विषय कोणता निघतो तेव्हा आणि तो कोठे जातो आणि नंतर भरकटत जातो असं झालं आहे . त्यामुळे कशापासून या गोष्टींची सुरुवात झाली हे बघतच नाही. सुशांत च्या केस मध्ये त्यांनी आत्महत्या केली सुशांतने आणि जेलमध्ये गेला बिचारा अर्णव असे म्हणत राज ठाकरे यांनी अर्णव गोस्वामींची पाठ राखण करत कशाला संबंध आहे का हे सांगा असा सवाल त्यांनी केला. सव्वा वर्षापासून सरकारमध्ये अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे सरकारची बदनामी झाली आणि कामापेक्षा बदनामी मध्ये गुंतून राहिले आहे का सरकार असे आपणास वाटते का? असा सवाल पत्रकारांनी राज ठाकरे यांना केला असता त्यांनी मजेशीर शयलीत उत्तर देत म्हणाले मला काल एक विनोद एकाने सांगितला, ‘सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?’
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 6, 2021, 1:45 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY