परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटवल्यावरच 100 कोटी रुपयांचा साक्षात्कार का झाला? राज ठाकरे यांचा सवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray Press Conference) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज (6 मार्च) यांनी आज सकाळी 11. ३० वाजता पत्रकार परिषदेत घेतली . राज ठाकरे काय भूमिका जाहीर करणार याबाबत सर्वाना उत्सुकता होती . काल (5 मार्च) रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर नेमकी काय चर्चा झाली याबाबत राज ठाकरे यांनी आज निवासस्थानी पत्रकार परिषदेत विवध मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्य सरकारसाठी केलेल्या काही सूचनांचीही माहिती दिली. मूळ मुद्द्यांपासून प्रसारमाध्यमं भटकत आहेत.
पुढे ते म्हणाले ,मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नाही.मूळ मुद्द्यांपासून प्रसारमाध्यमं भटकत आहेत. परमबीर सिंह ( Param Bir Singh) यांना मंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर 100 कोटी रुपयांबाबत साक्षात्कार झाला. त्यांना तो आधी का झाला नाही. जर त्यांना पदावरुन हटवले असते तर ते हे बोलले असते का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला.
तसेच महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. . “शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केलं पाहिजे. खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. विशेष गर्दी न होता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. ह्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा, तसेच “अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील करोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 6, 2021, 12:40 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY