Breaking News

Breaking News :अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा,दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री, उत्पादन शुल्क खाते अजित पवार यांच्याकडे जाणार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 5, 2021 3:34 pm
|

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. . दरम्यान, काही वेळेपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सिल्वर ओकवर बैठक संपन्न झाली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले. सीबीआयला यासंदर्भात 15 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.

तर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या गृहमंत्री पदाची माळ राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या गळ्यात पडली आहे. दिलीप वळसे पाटलांकडे सध्या उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे, पण गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात आली आहे.दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी कामगार कल्याण आणि उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा विभागासारखे अशा महत्त्वाच्या मंत्रीपदांची जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

दरम्यान,परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांवरील (Anil Deshmukh) कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 5, 2021, 3:34 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *