जे मंत्री नियम मोडतात तेच मंत्रिमंडळ बैठकीत lockdown चे निर्णय घेणार??? हे कितपत योग्य आहे??
सोलापूर : महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा (pandharpur mangalaveda assembaly constituncy) पोटनिवडणुकीत (by election) प्रचाराचा धडाका जोरात सुरु असल्याचं चित्र आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (minister jayant patil) यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत जंगी प्रचार सुरु केला आहे. , यावरून निलेश राणे यांनी देखील पाटील यांच्यावर निशाणा साधत म्हटलं आहे की, जे मंत्री नियम मोडतात तेच मंत्रिमंडळ बैठकीत lockdown चे निर्णय घेणार??? हे कितपत योग्य आहे?? ठाकरे सरकारचा कारभार म्हणजे पूर्ण बोगस कारभार. मुख्यमंत्र्याना त्यांच्याच पक्षातली लोकं व त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री गांभीर्याने घेत नाही हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असेल. असा निशाणा निलेश राणे यांनी ट्वीट करून साधला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा (corona) संसर्ग वाढत असताना पाटील यांनी एका प्रचारसभेत चक्का मास्क काढून भाषण केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी मास्क काढून भाषण केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सदर प्रचारसभेला संबोधित करत असताना “तुमचे चेहरे बघितल्यावर जगात कोरोना नसल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे मीही मास्क काढूनच बोलतो”, असं म्हणत जयंत पाटील यांनी चक्क मास्क काढून भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झालेली असताना पाटील यांनी मात्र, मास्क काढण्याचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना नियमांची पायमल्ली होत असताना दिसून येत आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 5, 2021, 11:53 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY