Breaking News

राज्य सरकारने “याकरिता” 30 पर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 5, 2021 11:37 am
|

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 57,074 रुग्णांची व 222 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 27,508 रुग्ण बरे झाले आहेत. यासह महाराष्ट्रातील एकूण संक्रमित प्रकरणांची संख्या 30,10,597 वर पोहोचली असून, सध्या 4,30,503 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 25,22,823 रुग्ण बरे झाले असून, 55,878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले असून या आकड्यांची तुलना इतर देशांशी केल्यास महाराष्ट्राची संख्या भारत आणि फ्रान्स देशाच्या ही पुढे जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 30 पर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य पॉझिटिव्ह रुग्ण येण्याच्या यादीत जगात 10 स्थानावर आहे. त्याआधी अमेरिका, ब्राझील, भारत, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, इटली, तुर्की आणि स्पेन आदी देशांचा समावेश आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 5, 2021, 11:37 am
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *