एसी वापरता तर वीज बिल कमी करण्याचे किंवा बचतीकरीता या टिप्स वापरा
सामान्य व्यक्ती म्हटले की काटकसर ही येतेच पण सध्याच्या फास्ट योगा जगात सोईसुविधा वापरल्या वापरायच्या म्हटल्या की त्या काटकसर इकडे थोडासा काळ कानाडोळा करावाच लागतो. घरात जर एसी, वॉशिंग मशीन फ्रीज यासारखी इलेक्ट्रॉनिक मोटर बेस उपकरण असेल तर त्याची वेळोवेळी सर्विसिंग केली पाहिजे अतिरिक्त लोड मुळे मोटरची वर्किंग एफीसी ऐसी कमी होते ज्याचा फरक थेट वीज वापरावर पडतो. अशातच उन्हाळ्याची झळ आता सगळ्यानाच बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यात असहाय्य होणाऱ्या उन्हामुळे अनेक जण थंड पेय पितात तर काहीजण एसीमध्येच किंवा पंख्या खाली बसून राहणे पसंत करतात. त्यातच ज्यांच्या घरी एसी आहे अशांच्या घरातील एसी हा दिवस चालू असतो. त्यांना एसी लावून त्यात बसणे जरी चांगले वाटत असले तरी महिन्याच्या शेवटी येणारे बिल पाहून त्यांना उन्हामुळे येणार नाही एवढा घाम येतो. पण आम्ही आज तुम्हाला बिल कमी कसे येईल याबाबत सांगणार आहोत. चला जाणून घेऊ काय आहेत त्या टिप्स…
काही जण एकदा एसी बसवल्यानंतर तो खराब होईपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यात धूळ जमा होते. धूळ जमा झाल्याने काँप्रेसरवर प्रेशर येतो आणि वीज जास्त लागते. त्यामुळे एसीकडे दुर्लक्ष न करता दर महिन्याला एसीच्या फिल्टरला साफ करा. यामुळे थंडावा वाढेल आणि उर्जेचा वापर कमी होईल. एसी चालू असताना दरवाज्या, खिडक्या व्यवस्थित बंद आहेत ना, याची खात्री करून घ्या. थंड हवा बाहेर जात असेल तर कुलिंग कमी होतं आणि जास्त ऊर्जा खर्च होते. एसीचा दिवसा वापर करताना तुमच्या खोलीमध्ये सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्या. हो, पण तुम्हाला नैसर्गिक सूर्यप्रकाश हवा असेल तर खिडक्यांवर रिफ्लेक्टिव्ह फिल्मचा वापर करू शकता. अशा रिफ्लेक्टिव्ह फिल्मस प्रकाशाला अडथळा न आणता ४० ते ६० टक्के उष्णता कमी करतात. या उपयामुळे वीजही वाचेल आणि तुमची खोली प्रकाशित होईल. एसी आणि पंखा एकत्र सुरू करू नका. यामुळे रूम लवकर थंड होईल असे अनेक जणांना वाटते. पण तसे काही होत नाही. उलट पंखा लावल्याने एसीची थंड हवा बाहेर फेकली जाते आणि एसी पुन्हा ऑन होतो. तेव्हा दोन्ही उपकरणे एका वेळी सुरू करू नका. एसीबरोबर तुम्हाला पंख्याचीही हवा हवी असेल तर टेबल फॅन सुरू करा. तो तुमच्या शरीरावर थंड वारा सोडेल आणि एसी अख्खी रूम थंड करेल. एसी 22 ते 24 वर ठेवा. त्याहून कमी ठेवला तर जास्त वीज खर्च होते. दरम्यान ,जेवढे तापमान आपण कमी करू तेवढा एसीच्या कंप्रेसर व लोड येतो परिणामी विजेचा वापर तेथे जास्त होतो.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 5, 2021, 10:47 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY