मोठी बातमी: महाराष्ट्रात उद्यापासून विकेंड लॉकडाऊन, शनिवार-रविवारी कडक निर्बंध-वाचा काय बंद राहणार
मुंबई : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काल एकाच दिवसात जवळजवळ 50 हजार रुग्ण आढळले आहेत. अशात राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागेल अशी चर्चा काही दिवस होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. याबाबत सरकारने नवी नियमावली तयार केली आहे त्यानुसार राज्यात उद्यापासून लॉकडाऊन नाही तर, शनिवार-रविवारी म्हणजेच वीकएंड राज्यात कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू असतील असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय, नाईट कर्फ्यू सुरुच राहणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. हा निर्णय एकमताने झाला आहे. हा निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा केली.
Maharashtra will enter strict weekend lockdown from Friday 8 pm to Monday 7 am. Essential services and transportation including buses, trains, taxis are permitted: Maharashtra Minister Nawab Malik pic.twitter.com/9bylFRal9q
— ANI (@ANI) April 4, 2021
Maharashtra will enter strict weekend lockdown from Friday 8 pm to Monday 7 am. Essential services and transportation including buses, trains, taxis are permitted: Maharashtra Minister Nawab Malik pic.twitter.com/9bylFRal9q
— ANI (@ANI) April 4, 2021
राज्यात काय बंद राहणार ?
शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत कडकडीत बंद
अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी
बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
धार्मिक स्थळांवर निर्बंध
सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद
रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक
लोकल ट्रेन सुरू
जिम बंद होणार
रेस्टॉरंट, मॉलमध्ये पार्सल सुविधा
गार्डन, मैदाने बंद
लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित
शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील
सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार
मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
प्रतिबंधित क्षेत्र तयार करा
सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार
20 लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 4, 2021, 6:54 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY