छत्तीसगढमध्ये नक्षली हल्ला: सैनिकांचे बलिदान कधीही विसरणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली
रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलप्रभावित बीजापूर आण सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा बलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात सुरक्षा बलाचे 22 जवान शहीद झाले. 15 जवान बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना बीजापूर आणि रायपूरच्या रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिक शहीत झाल्यावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की सैनिकांचे बलिदान कधीही विसरणार नाही. छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. शूर हुतात्म्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. जखमी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
My thoughts are with the families of those martyred while fighting Maoists in Chhattisgarh. The sacrifices of the brave martyrs will never be forgotten. May the injured recover at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) April 3, 2021
मिळालेल्या माहितीनुसार,काही जवानांचे मृतदेह खुल्या मैदानात तर काही गावात पडून होते. शहीद जवानांची नावे अद्याप समोर आली नाहीत. अधिकृत माहितीनुसार 23 सैनिकांच्या शहीद झाल्याची माहिती येत आहेत.तसेच नक्षलवाद्यांनी सैनिकांची शस्त्रे व शूज लुटले आणि जंगलात गायब झाले. या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. नक्षलवाद्यातील एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. असे सांगितले जात आहे की नक्षलवादी आपल्या साथीदारांच्या मृतदेहासह पळून नेले आहे. मात्र, त्या भागात अद्याप शोध सुरू आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 4, 2021, 6:28 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY