रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,सहकार्य करावे :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना फोन
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे राराज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी राज ठाकठाकरेंना फोनवरील संवादात केले आहे.
दरम्यान , राज्यातील परप्रांतीय आणि स्थलांतरीत मजूर पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी परतण्याच्या बेतात आहे. काही परप्रांतीय मजूरांनी स्थलांतरही सुरु केले आहे. सरकारने लॉकडाऊन अद्याप जाहीर केला नाही. फक्त लॉकडाऊन लावणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात काही प्रमाणात भीती निर्माण झाल्याचे पाहायला मिळते आहे. प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबई शहरातील स्थलांतरीत कामगार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करताना दिसत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, दादर रेल्वे स्टेशनवर मजूर मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. या गर्दीत प्रामुख्याने उत्तर भारताकडे जाणाऱ्या मजूरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं @CMOMaharashtra
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 4, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 4, 2021, 3:43 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY