Breaking News

Big Breaking on Lockdown: मोठी बातमी : सरकारच ठरल ! महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊन ?

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 3, 2021 4:46 pm
|

मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. राज्यात आज 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे.

दरम्यान, कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी सवांद साधला होता. कोरोना रुग्णसंख्या कायम वाढत राहिल्यास दोन दिवसात संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय घेऊ, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच मला नियम पाळताना दृश्य स्वरूपात दिसलं नाही तर २ दिवसात पूर्ण लॉकडाऊन करणार, आता लावत नाही पण हा इशारा देतोय. तसेच मला दोन दिवसांत जर कोणतेही पर्याय नाही मिळाले तर दुर्दैवाने मला लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला होता.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 3, 2021, 4:46 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *