मोठी बातमी! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात थेट प्रवेश ; वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी माहिती दिली आहे. तसेच, इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
“राज्यातील कोरोना संक्रमणाच्या स्थितीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोना संकटाच्या काळात ऑनलाईन पद्धतीच्या माध्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. या काळात पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरु करणे शक्य झाले नाही. दरम्यान, पाचवी ते आठवीच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या आहेत. तर, काही ठिकाणी नाही. ज्या ठिकाणी शाळा सुरु करण्यात आली, तेथेही अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खरे पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन व्हायला हवे. मात्र, यावर्षी ते होऊ शकलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे”, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 3, 2021, 4:22 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY