Breaking News

.. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून ?; मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 3, 2021 3:50 pm
|

मुंबई : राज्यात लॉकडाउनची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये इतर देशांमध्ये कशा पद्धतीने लॉकडाउन जाहीर केले जात आहे याची उदाहरणे दिली. महाराष्ट्रात सुद्धा लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी बोलताना दिला. त्यावरूनच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. इतर देशांमध्ये लॉकडाउनची जशी मुख्यमंत्र्यांनी उदाहरणे दिली. तुलना करायचीच असेल तर त्या ठिकाणी नागरिकांना पॅकेज जाहीर करण्यात आले आहेत. अशी आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली. फडणवीसांनी दिलेल्या उत्तराला राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Jitendra Awahad responds to criticism of CM Thackeray).

ज्या देशांची फडणवीसांनी उदाहरणे दिली तेथे राज्य सरकारांनी नव्हे तर केंद्र सरकारांनी पॅकेज दिले. आपले केंद्र सरकार तर राज्य सरकारच्या हक्काचे पैसे सुद्धा देत नाही. त्यामुळे, फडणवीसांनी आपले वजन वापरून काही मिळते का हे पाहावे असे आव्हाड यांनी म्हटले आहे. पुढे जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कामगिरीचे तोंडभर कौतुक केले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 3, 2021, 3:50 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *