राज्यात आज ४७,८२७ नव्या कोरोना रुग्णांची मोठी भर; २०२ मृत्यू
मुंबई : महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने कहर केला. गेल्या २४ तासांत राज्यांत तब्बल ४७,८२७ नवीन काेरोना रुग्ण वाढले आहेत. ही काेरोना महामारी सुरू झाल्यापासूनची उच्चांकी संख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २९ लाख ४,०७६ वर पाेहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही ३ लाख ८९,८३२ वर गेली आहे. गुरुवारी २०२ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या ५५,३७९ झाली आहे. दुसरीकडे, दिवसभरात २४,१२६ रुग्ण बरे हाेऊन घरीही परतले.राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा आता २४ लाख ५७,४९४ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.६२ टक्क्यांवर आले आहे. राज्याचा मृत्युदर १.९१% इतका आहे.
राज्यात आजवर २ कोटी १ लाख ५८,७१९ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १४.४१ टक्के जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २१ लाख १,९९९ जण होम क्वॉरंटाइन, तर १९,२३७ जण संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 3, 2021, 12:04 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY