Breaking News

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचं कोरोनानं निधन, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून श्रद्धांजली

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 3, 2021 11:55 am
|

पुणे – राजेंद्र सरग यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सरग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अनेकवेळा डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेऊन मदत करण्याच्या सूचना केल्या. मात्र कोरोनापुढे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.विशेष म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलगा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील सात जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्याचे सर्व माध्यमांशी व पत्रकारांशी अत्यंत सलोख्यचे संबध असलेले शासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख होती.

सरग यांचा माध्यम क्षेत्राशी मोठा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. मनमिळावू, सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणारा हक्काचा माणूस असा सरग यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे माहिती खात्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

“पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 3, 2021, 11:55 am
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *