तुर्तास लॉकडाऊनचा इशारा देतोय पण आज त्याबद्दल जाहीर करत नाही- उद्धव ठाकरे
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंता व्यक्त केली. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी जनतेला संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मार्चच्या आधीपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. तुर्तास लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातीव परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत लवकरच निर्णय घेणार.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, घाबरुन जाऊ नका. मी आपल्याला घाबरवण्यासाठी आलो नाही. तर आजची परिस्थिती काय, त्यावर मार्ग काढण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधत आहे. एक वर्ष झाले, आपण एका विचित्र विषाणूसोबत दिवस काढत आहोत. मार्च महिन्यातच कोव्हिडने महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यानंतर राक्षसासारखा महाराष्ट्रावर हावी झाला. मधल्या काळात परिस्थिती नियंत्रणाल आली होती. आपण संयमी राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या महिन्यात पार पडलं. लॉकडाऊन काळात जगाची आर्थिप परिस्थिती खराब झाली. तरीही अजित पवार यांनी संकटातही महाराष्ट्र पुढे नेणारा अर्थसंकल्प मांडला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातसध्या 70 टक्के RTPCR चाचण्या होत आहेत. राज्यातील स्थिती भीतीदायक असली तरी आपण सत्य समोर आणत आहोत. इतर राज्यात निवडणुका असो किंवा काय तिकडे कोरोना नाही असं विचारलं जातं, पण मला त्या राज्यांचं पडलेलं नाही, मला महाराष्ट्र प्यारा आहे. आम्ही सत्यच सांगत राहू, मग मला व्हिलन ठरवलं तरी चालेल. जेव्हा कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला तेव्हा टेस्टिंगचे फक्त दोन लॅब होते. पण आज त्या दोनच्या पाचशे पर्यंत चाचण्या करणाऱ्या संस्था तयार केल्या आहेत. आपण मुंबईत सध्या दररोज 50 हजार चाचण्या करतोय. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात क्षमतेपक्षा जास्त चाचण्या करतोय. दररोज 1 लाख 80 हजार चाचण्या करतोय. याच चाचण्या अडीच लाखांवर करणार आहोत.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सध्या राज्यात मुंबईची परिस्थिती सर्वात बिकट आहे. आजचा आकडा 8 हजाराच्या पुढे गेला आहे. सध्या राज्यात विलगीकरण बेड 2 लाख 20 हजार आहेत, यातील 1 लाख 37560 भरले आहेत. ICU बेड 205019 असून, यातील 48 टक्के भरले आहेत. ऑक्सिजन बेडही 25 टक्के भरलेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधा अपुऱ्या पडतील. या सुविधा आवश्यकतेनुसार वाढवल्या जात आहेत. पण, सुविधा वाढवणे म्हणजे बेड वाढले, ऑक्सिजन वाढले, व्हेटिलेटर वाढले पण डॉक्टर, नर्सेस कसे वाढणार ? गेल्या वर्षीपासून हे राबत आहेत. यापैकी बऱ्याच जणांना कोव्हिडची लागण झाली आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना, लॉकडाऊन परिस्थितीच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणाऱ्या पक्षांना, आरोग्य सुविधा वाढवण्याचा सल्ला देणाऱ्याउद्योगपतींनाही टोला लगावला. ते म्हणाले की, तर कोरोनाची लस घेतल्यानंतर सुद्धा नागरिकांनी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोविड19ची लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असे नाही. पण त्यापासूनची खातरता कमी होण्याची शक्यता आहे. रुग्णवाढ थांबण्यासाठी अद्याप कोणताही उपाय नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पदे ते म्हणाले , परिस्थिती हाताबाहेर गेली तर, ब्राझीलसारखे चित्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. रोजगार परत मिळेल. पण, गेलेला जीव परत मिळणार नाही. मला वेगळा उपाय हवा. लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य असलं तरी संसर्गाची साखळी तोडायची कशी? लॉकडाऊन झाला, तर रस्त्यावर उतरा, असे सांगणाऱ्यांना मी सांगतो की गरजूंची मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा, आरोग्य सेवकांना मदतीचा हात देण्यासाठी रस्त्यावर उतरा. कोरोनाविरोधातच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरा.
लॉकडाऊन हा घातक पण आपण कात्रीत सापडलो आहोत. याच पार्श्वभुमीवर विरोधी पक्षांच्या लॉकडाऊनच्या भुमिकेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. मास्क न घालण्याबद्दल शौर्य काय? यावरुन उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. जनतेच्या जीवासोबत खेळ होईल असे विरोधकांनी राजकरण करु नका अशी विनंती केली आहे. तर राज्यात कठोर निर्बंध लादले जाणार असून त्याबद्दल पुढील एक-दोन दिवसात नवी नियमावली जाहीर केली जाईल. पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय पण आज त्याबद्दल जाहीर करत नाही असे उद्धव ठाकरे यांनी अखेरीस स्पष्ट केले आहे.
सध्या राज्यात लसीकरणावर भर दिला जातोय. समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्र हे देशातील नंबर एक राज्य ठरले, आपण एका दिवसात 3 लाख लोकांना लसीकरण केले. आतापर्यंत सुमारे 65 लाख लोकांना लसीकरण केले. अजूनही मागणी करतोय, पण केंद्राने पुरवठा वाढवायला हवा. आजची आपली क्षमता 3 लाख आहे, ती 6-7 लाख करण्याची तयारी आहे. पण, फक्त लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही, असे नाही. अनेकांना लस घेऊनही कोरोना होत आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क कायम वापरावा लागेल.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 2, 2021, 9:26 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY