रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर प्रियंका गांधी होणार होम क्वारंटाईन
नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी आज आपला आसाम दौरा रद्द केला आहे. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) कोरोना पॉझिटिव्ह (COVID19 Positive) आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्यानंतर प्रियंका यांनी हा दौरा रद्द केला. स्वत: प्रियंका गांधी यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रियंका गांधी यांनी स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. वड्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रियंका यांनी तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घेतली. मात्र, सुदैवाने प्रियंका यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु, डॉक्टरांनी त्यांना अलग राहण्याचा सल्ला दिला आहे. रॉबर्ट वड्रा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे.
प्रियंका गांधी ट्विट –
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटरमध्ये यासंदर्भात माहिती देताना म्हटलं आहे की, अलीकडेचं कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आल्याने मला माझा आसाम दौरा रद्द करावा लागत आहे. गुरुवारी माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी पुढचे काही दिवस क्वारंटाईन राहणार आहे. या गैरसोयीबद्दल मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करते.
हाल में कोरोना संक्रमण के संपर्क में आने के चलते मुझे अपना असम दौरा रद्द करना पड़ रहा है। मेरी कल की रिपोर्ट नेगेटिव आई है मगर डॉक्टरों की सलाह पर मैं अगले कुछ दिनों तक आइसोलेशन में रहूँगी। इस असुविधा के लिए मैं आप सभी से क्षमाप्रार्थी हूँ। मैं कांग्रेस विजय की प्रार्थना करती हूँ pic.twitter.com/B1PlDyR8rc
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 2, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 2, 2021, 3:56 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY