“आज संध्याकाळपर्यंत निर्णय होणार”; रुग्णसंख्या वाढीवर विजय वडेट्टीवारांचं महत्वाचं विधान
मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून दैनंदिन रुग्णवाढीने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लॉकडाउनसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख या तिघांनी लॉकडाउनसंदर्भात विचार केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत अधिक कडक निर्बंध कसे लावता येतील, यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे आमच्या विभागाकडून कालच यावर नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फाईल गेली आहे. आज संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
विजय वडेट्टीवार यांना मुंबई लोकल बंद होणार का? असे विचारण्यात आले असता म्हणाले , लोकल बंद होणार नाही, पण त्यावर निर्बंध कडक लावले जातील आणि त्याचे वेगळ्या पद्धतीने नियोजन केले जाईल. गर्दी कमी करुन लोकांना सुविधा देण्यावर भर असेल, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, गुरुवारी २४ तासांत राज्यात ४३ हजार १८३ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर २४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक ८६४६ नवे रुग्ण मुंबईत आढळले असून राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ५३३ झाली असून त्यातील सर्वाधिक ६४,५९९ रुग्ण पुण्यात असून, मुंबईतील ५४,८०७ रुग्णांचा समावेश आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 2, 2021, 2:50 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY