Breaking News

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन की कठोर निर्बंध?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री साडेआठ वाजता करू शकतात मोठी घोषणा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 2, 2021 2:35 pm
|

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का अशा चर्चांना उधान आले आहे. कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर(Action Mode) आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddha Thackeray)आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, यात राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन बाबत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी राज्यात लॉकडाउन लागणार की कडक निर्बंध लावण्यात येतील हे स्पष्ट होणार आहे.तर लॉकडाऊन कोणालाच नकोय पण आरोग्य यंत्रणांवरील वाढता दबाव पाहता कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यांमध्ये वाढता कोरोना पाहता आता नियम अजून कडक करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण आणि शहर भागांत वाढता प्रादुर्भाव पाहता संध्याकाळी 6 ते दिवसा 6 या 12 तासांसाठी संचारबंदी (Night Curfew) असेल तर दिवसा जमावबंदी लागू राहणार आहे. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. दरम्यान उद्या (3 एप्रिल) पासून हॉटेल, बार, रेस्टॉरंट हे डाईन इन साठी पुढील 7 दिवसांसाठी पूर्ण बंद केली आहे. पण होम डिलेव्हरी सुरू राहणार आहे. यासोबतच पुणे शहरामध्ये पीएमपीएमएल बस (PMPML Bus Service) सेवा बंद राहणार आहे. पण एसटी सेवा (ST Bus Service) ही सुरू राहणार आहे. सोबतच सारी प्रार्थनास्थळं देखील 7 दिवस पूर्णपणे सुरू राहणार आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पुणे शहरांत लग्न आणि अंत्यविधी वगळता सारे धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहेत. पुण्यात 30 एप्रिल पर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत. पण 10 वी 12वी च्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव (Pune Divisional Commissioner Saurabh Rao) यांनी दिली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 2, 2021, 2:35 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *