राज्यात कोरोनाचा उद्रेक, आढळले ६३ हजार ७२९ नवे कोरोना रुग्ण
मुंबईः देशातील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर गेली आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. प्रत्येक राज्य, प्रत्येक शहरात पहिल्या तुलनेत खूप जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान,महाराष्ट्रात २४ तासांत ६३ हजार ७२९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ४५ हजार ३३५ जण २४ मागील २४ तासांत कोरोनामुक्त झाले. राज्यात २४ तासांमध्ये कोरोनामुळे ३९८ मृत्यू झाले. तसेच मुंबईत आज 8 हजार 834 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 52 जणांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 67,123 fresh COVID cases, 56,783 discharges, and 419 deaths in the last 24 hours
Active cases: 6,47,933
Total discharges: 30,61,174
Death toll: 59,970 pic.twitter.com/UCRDvgmWe4— ANI (@ANI) April 17, 2021
#CoronavirusUpdates
17-Apr, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/PS30NXlMG2— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 17, 2021
आतापर्यंत महाराष्ट्रात ३७ लाख ३ हजार ५८४ कोरोनाबाधीत आढळले. यापैकी ३० लाख ४ हजार ३९१ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात कोरोनामुळे ५९ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला. कोरोना झालेल्यांपैकी १ हजार ६०८ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या ६ लाख ३८ हजार ३४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आतापर्यंत २ कोटी ३३ लाख ८ हजार ८७८ कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ३७ लाख ३ हजार ५८४ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आढळल्या. राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १५.८९ टक्के आहे. महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८१.१२ टक्के आहे. राज्याचा कोरोना मृत्यू दर १.६१ टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या ३५ लाख १४ हजार १८१ जण होम क्वारंटाइन आहेत तर २५ हजार १६८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 17, 2021, 9:11 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY