India Coronavirus Updates : कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, देशात गेल्या 24 तासांत 35 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भावात काहीशी घट झाली असली, तरी धोका अद्याप कमी झालेला नाही. आजही देशात 35 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 35 हजार 786 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासात 35 हजार 786 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 37 हजार 812 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यात 511 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 6 दिवसात मृत्यूंची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. देशात आतापर्यंत 4.33 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये
गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 35,786
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 37,812
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 511
आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.23 कोटी
आतापर्यंत बरे झाले : 3.15 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.33 लाख
सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 3.58 लाख
India reports 36,401 new #COVID19 cases and 39,157 recoveries in the last 24 hrs, as per Health Ministry
Total recoveries: 3,15,25,080
Active cases: 3,64,129 (lowest in 149 days) pic.twitter.com/C3dWPTXPov— ANI (@ANI) August 19, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 19, 2021, 11:49 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY