Breaking News

कोरोना देशात:24 तासांमध्ये 3 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण तर 3 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू, आरोग्य मंत्रालयाची माहिती

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 3, 2021 10:52 am
|

नवी दिल्ली: जगभरासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा तुफान वाढत आहे. अशातच देशातील विविध राज्यांनी 15 दिवसांच्या कठोर लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. दुसऱ्या बाजूला आरोग्य सेवेवर पडत असलेला ताण पाहता त्याचा फटका रुग्णांना सुद्धा पडत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्सची कमतरता आणि औषध साठ्यात घट झाल्याने रुग्णांचा मोठ्या प्रमाणात बळी जात आहे. त्याचसोबत रुग्णांचा आकडा सुद्धा त्याच पटीने वाढत आहे. अशातच राज्यात कोरोनाचे गेल्या 12 दिवसांमध्ये सलग तीन लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण समोर येत आहेत. रविवारी पुन्हा एकदा 3 लाख 50 हजार 598 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 3,071 रुग्णांनी जीव गमावला आहे. आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 882 राहिली. तर एकूण संक्रमितांचा आकडा आता दोन कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. आज ही संख्या 1.99 कोटींच्या पार पोहोचली आहे.

भारतात व्हायरसचा प्रकोप किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज आपल्याचा ताज्या आकडेवारीवरुन येऊ शकतो. शनिवारी जगाच्या टॉप-50 संक्रमित देशांमध्ये मिळून 3.91 लाख लोक संक्रमित आढळले, तर एकट्या भारतामध्ये 3 लाख 92 हजार 459 रुग्ण आढळले. म्हणजेच 50 देशांमधील एकूण रुग्णांपेक्षा एक हजार जास्त रुग्ण भारतात आढळले.

पहिल्यांदाच एका दिवसात 3 लाखांपेक्षा जास्त रिकव्हरी

पहिल्यांदाच एका दिवसाच्या आत 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. या दरम्यान रिकव्हर होणाऱ्यांची संख्या 3 लाख 8 हजार 522 होती. आतापर्यंत जगाच्या कोणत्याही देशात एकाच वेळी एवढे रुग्ण रिकव्हर झालेले नाही. यापूर्वी शुक्रवारी 2.99 लाख लोक बरे झाले होते.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस :3.68 लाख
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 3,417
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :3.07 लाख
आतापर्यंत एकूण संक्रमित झालेले : 1.95 कोटी
आतापर्यंत बरे झाले : 1.59 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 2.15 लाख
सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 33.43 लाख


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 3, 2021, 10:52 am
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *