जव्हारमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू तर दिवसभरात 24 रुग्ण पॉझिटिव्ह
पालघर -जव्हार: कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. पालघर जिल्हातील जव्हार शहरातमध्ये कोरोनामुळे एका 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू तर दिवसभरात 24 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अधिक काळजी घ्या, तसेच कोणालाही ताप, सर्दी, खोकला, हातपाय दुखत असतील आशा रुग्णांनी आपली कोरोना चाचणी करावी असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
दरम्यान , राज्यात आज 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 24 हजार 126 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 24 लाख 57 हजार 494 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 3 लाख 89 हजार 832 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 3, 2021, 5:07 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY