Breaking News

आज 18 वर्षावरील सर्वांसाठी ४ वाजल्यापासून सुरु होणार लसीकरणासाठीची नोंदणी! कसे कराल रजिस्ट्रेशन -वाचा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 28, 2021 2:33 pm
|

मुंबई : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 28 एप्रिल 2021 रोजी ‘कोविन प्लॅटफॉर्म’ व आरोग्य सेतु अ‍ॅपवर नोंदणी सुरू होईल. आजपासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती कोविन पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतील. याशिवाय ही नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशनशिवाय तुम्हाला लस मिळणार नाही. लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी रिजिस्ट्रेशन सक्तीचे करण्यात आले आहे.कोविन पोर्टल https://selfregistration.cowin.gov.in/ वर लॉगिन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्‍ट्रेशनची प्रक्रिया आज संध्याकाळी 4 वाजेपासून सुरू होईल.45 वर्षांहुन जास्त वयाच्या व्यक्तींना स्पॉट रजिस्ट्रेशन म्हणजेच लसीकरण केंद्रावर स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा पहिल्याप्रमाणेच सुरू राहील.

कसे कराल रजिस्ट्रेशन?

सरकारतर्फे ​पीआयबीने रजिस्ट्रेशनची प्रॉसेस सांगितली आहे. कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन प्रॉसेस पूर्वीप्रमाणेच आहे. तुम्हाला कोविन पोर्टल (https://selfregistration.cowin.gov.in/)

वर किंवा आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून लसीसाठी नोंदणी करावी लागेल.

अशी आहे पूर्ण प्रॉसेस…

https://selfregistration.cowin.gov.in पोर्टलवर रजिस्ट्रेशनचे पर्याय .
येथे तुम्हाला आपला मोबाइल क्रमांक नोंदवावा . गेट ओटीपीवर क्लिक करावे .
तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपीचा मेसेज येईल. हा ओटीपी 180 सेकंदांत टाकावा .
मग सबमिट करताच नवे पेज ओपन होईल. येथे तुम्हाला आपला तपशील भरायचा आहे.
फोटो ओळखपत्रासाठी आधार कार्डशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्‍मार्ट कार्ड आणि मतदार कार्डाचाही पर्याय आहे.
कोणताही एक पर्याय निवडून आपला आयडी नंबर टाकावा.
यानंतर आपले नाव, लिंग आणि जन्मतिथी टाकावी लागेल.
यानंतर जवळचे कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर निवडण्याचा पर्याय येईल.
सेंटर निवडल्यानंतर तुम्ही आपल्या सुविधेनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता.
जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा जाऊन व्हॅक्सिन घ्या.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 28, 2021, 2:33 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *