Breaking News

देशात संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी 15 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन?; टास्क फोर्सने केंद्र सरकारला दिला सल्ला,

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 3, 2021 4:56 pm
|

नवी दिल्ली : मागच्या 24 तासांत देशात साडेतीन लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी 50 देशांमध्ये एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे. कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी दुसऱ्या लाटेतील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात दोन आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यक आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागच्या आठवडाभरापासून या मागण्या टास्क फोर्सने केल्या आहेत. या सदस्यांमध्ये एम्स आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांचा समावेश आहे. दुसऱ्या लाटेमध्ये तेजीने परसत असलेल्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कोविड टास्क फोर्सच्या मेंबर्सने कम्प्लीट लॉकडाऊनची मागणी केली आहे. या मेंबर्समध्ये एम्स आणि इंडियन काउंसल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)चा समावेश आहे. दरम्यान ,केंद्राने ICMR आणि एम्सच्या सल्ल्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सूत्रांनुसार 3 मेनंतर केंद्र यावर निर्णय घेऊ शकते. असे म्हटले जात आहे की, पूर्ण लॉकडाऊन नाही तर आंशिक लॉकडाऊनची घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते.

मे महिन्यात दुसरी लाट ओसरण्याची शक्यता

देशात सध्या दररोज विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. फेब्रुवारीच्या अखेरपासून सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट आता मे अखेरपासून कमी होण्याची शक्यता आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी गणितीय मॉडेलच्या आधारे व्यक्त केली आहे. तथापि, यापूर्वीच म्हणजेच मे मध्यात दररोज 5 ते 6 लाख कोरोना रुग्ण समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत अफाट वाढ होईल, परिणामी देशात मोठ्या प्रमाणात बेड्स, ऑक्सिजनचा तसेच इतर वैद्यकीय सुविधांचा तुटवडा भासेल. म्हणूनच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात दोन आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.

डॉ. जमील मानतात म्हणतात

जर लोकांनी कोरोना दिशा-निर्देशांचे पालन केले तर मेच्या अखेरपर्यंत आपण दुसऱ्या लाटेपासून मुक्त होऊ शकतो. मात्र लोक अशा प्रकारे नियम मोडतच राहिले तर ही लाट अजूनही वाढू शकते.

राज्यांनी केला लॉकडाऊन लावण्याचा निर्णय

सध्या दिल्ली, राजस्थान, हरियाणा, ओडिशामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यूपीमध्ये वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मध्य प्रदेशातही 7 मेपर्यंत जनता कर्फ्यू लावला गेला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 3, 2021, 4:56 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *